Tuesday, November 18, 2008

प्रेम असेही असू शकते?

ही गोष्ट मी लिहिली नाही पण मी वाचली... अन थेट काळजाला जाऊन भिडली...म्हणुन येथे देत आहे ...

नक्कीच आवडेल तुम्हाला.....

अशाच एका संध्याकाळी खुप उदास होतो। काय कराव तेच सुचत नवते । वाटले स्मशानात जावे। तिथे तरी शांती मीळते का ते पहावे। गेलो मग स्मशानात ... एकटाच ......

जाऊन बसलो एक थडग्याजवळ। थडगे ताजे वाटत होते... मनात कुतूहल जागे झाले .

थडग्यावरचे नाव वाचले " महजान खान १९८४ - २००७ "... म्हणजे माझ्याच वयाची असेल।

काय झाले असेल तीला ? कसा झाला असेल तिचा मृत्यु? आजार, खून की आत्महत्या?

मनात उगाच विचारांचे काहूर माजले।

तेवढ्यात एक मुलगा तिच्या थडग्यावर फूल ठेवण्यासाठी आला।

मी विचारले "तू भाऊ का तीचा ?"

तो म्हणाला “ नाही, मी तो ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली !”
मी विचारले “ आत्महत्येचे कारण ?”
“मला ब्लड कँसर झाला आहे . 2 आठवडे उरले आहेत फ़क्त …”
मी चकित …विचारले “ मग तिने आत्महत्या का केली तू जीवंत असतांनाही ?”
तो म्हणाला “ ती पुढे गेली आहे माझ्या स्वागताच्या तयारी साठी …”
…….मी निशब्द …..
हेच ते प्रेम जे मनाला भीडते अन …
आपल्या नकळत आयुष्यातले सारेच पावसाळे डोळ्यासमोर नव्हे तर डोळ्यात उभे करते ......

Ur's Umesh.........

1 comment:

Unknown said...

khup chan.........
mast........